आपण हृदयाची काळजी घेतली तरच हृदय आपली काळजी घेईल.
–हृदय हा एकच अवयव असा आहे की जो आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यरत असतो.
* आजकाल तरुण वयातच हृदय विकार होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याला आपली बदललेली जीवन शैली कारणीभूत आहे. पुर्वी मुलांना मैदानी खेळांची सवय होती, पाची चालाव लागायच शिवाय सायकलचा वापरही मोठ्या प्रमाणात असायचा.
** आता मोबाईल गेम, स्वयंचलीत वाहन, फास्टफुड यामुळे शरीरात मेद वाढत आहे व रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे वाढत आहे. काही तरुण जीममध्ये अती कठोर व्यायाम करत आहेत व हृदयावर अतीरीय भार वाढल्यामुळे जीव गमावत आहेत
* आजच्या स्पर्धेच्या युगात लोक मानसीक तणावान जगत आहेत, हा तणाव तुमच्या शरीराला आतून पोखरत आहे. काही लोक तणावामुळे व्यसनांच्या आहारी जातात.त्यामुळे मधुमेह होऊ शकतो हे त्यांना अजून अडचणीत आणत आहे. हे त्यांना अजून अडचणीत आणत आहे.यातून बाहेर पडण्यासाठी खालील बदल आपल्या रोजच्चा व्यवहारात करावे.
1)सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार घालावेत किंवा हलके फुलके व्यायाम करावेत. घाम येणे आवश्यक आहे.
2) 5 ते 10 मिनीट मन एकाग्र करून शांत बसावे. तणाव कमी होईल
3) जेथे शक्य असेल तेथे पायी जावे किंवा सायकल वापरावी
4) तणाव निवळण्यासाठी भावना व्यक्त करायची सवय ठेवा शिवाय मनमोकळ हसायला शिका.
5) रोजचा आहार पारंपारीकच ध्या कधीतरीच वेगळा आहार ध्या, ‘पॅक फुड, फास्टफुड, स्निग्ध पदार्थ शक्यतो टाळावे.
6)ऑफीस जॉब असेल तर दर तासाला ‘उठून 2 मिनिट फीरून पुन्हा जागेवर बसावे त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह नियमीत होईल.या सर्व गोष्टी तुमचे –हृदय सक्षम ठेवण्यास मदत करतील. वयाच्या पन्नाशी नंतर नियमीत तपासण्या करून डॉक्यांचा सल्ला घ्यावा. उतारवयात, आपल्या आयुष्यात घडलेल्या आनंददायी घटना आठवून त्या परत जगण्याचा प्रयत्न करावा व वाईट आठवणी विसरून जाव्यात. यामुळे तुमचे मानसीक स्वास्थ उत्तम राहील व आजार तुमच्या पासून दूर पळेल.
–हदयाची काळजी घ्या त्यात तुमची प्रेमाची माणसे रहातात.
जागतीक हृदय दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!
श्री. मकरंद जोशी
जनरल मॅनेजर (मार्केटिंग व ॲडमिनिस्ट्रेशन )
इंदूकेअर फार्मा प्रा. लि.पुणे.
