दोषधातुमलामुलंति हि शरीरम्। वाग्भंट आयुर्वेदानुसार शरीराची रचना ही दोष, धातू व मल यांच्या समतोलावर आधारलेली आहे. वात, पित्त व कफ
हे तीन दोष; रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र हे सात धातू; तसेच स्वेद, मूत्र व पुरीष हे तीन मल — यांच्या योग्य संयोगातूनच सुदृढ शरीराची निर्मिती होते.
“समदोषः समनिश्च सामधातु मलक्रिया। प्रसन्नात्मेट्रिय मनः स्वस्थ इति अभिरपिते ।।
वरील श्लोकानुसार, दोष, अग्नि, धातू व मल यांच्या क्रिया समतोलात असतील आणि आत्मा, इंद्रिये व मन प्रसन्न असतील तर ती व्यक्ती ‘स्वस्थ’ मानली जाते. दोष व अग्नि यांचे महत्त्व वात, पित्त व कफ या दोषांच्या असंतुलनामुळे विविध आजार निर्माण होतात. त्यामुळे आयुर्वेदात आजारांचे वर्गीकरण वातप्रधान, पित्तप्रधान व कफप्रधान असे केले जाते. शोधन चिकित्सेमध्ये वातविकारांसाठी बस्ती, पित्तविकारांसाठी विरेचन आणि कफविकारांसाठी वमन यांचे महत्त्व सांगितले आहे.
“रोगः सर्वोऽपि मन्दाग्निजः” या सूत्रानुसार बहुतेक सर्व रोगांचे मूळ कारण अग्निमांद्य आहे. अग्नि दुर्बल झाल्यास अन्नाचे योग्य पचन होत नाही व त्यातून ‘आम’ निर्माण होतो.
आमपाचक (रोबस्ट–१)
अपथ्यकर आहार-विहारामुळे उत्पन्न होणारा आम हा अरुचीपासून आमवातापर्यंत अनेक रोगांचा मुख्य कारणीभूत घटक आहे. म्हणूनच आयुर्वेदात उपचाराची सुरुवात आमपाचनाने करण्याची परंपरा आहे. हरितकी, चित्रक, शुद्ध कुचला, हिंग, सैंधव, गंधक व कुमारी स्वरसयुक्त आमपाचक वटी आम नष्ट करून अग्निदीपनाचे कार्य करते. आमपाचक म्हणून कार्य करणारे रोबस्ट–१ अग्नि सुधारून आमपाचन करते व पुढील धातुपाचनासाठी शरीर सिद्ध करते. त्यामुळे अग्निमांद्य, अंगगौरव, अंगमर्द, ज्वर ते आमवात अशा सर्व
अवस्थांमध्ये चिकित्सेची पहिली पायरी म्हणून रोबस्ट–१ उपयुक्त ठरते. हरितकी, चित्रक, शुद्ध कुचला, हिंग, सैंधव, गंधक व कुमारी स्वरसयुक्त आमपाचक वटी आम नष्ट करून अग्निदीपनाचे कार्य करते.
रसपाचक (रोबस्ट २) आहाररसापासून निर्माण होणारा पहिला धातू म्हणजे रसधातू. तो व्यानवायूच्या साहाय्याने संपूर्ण शरीरात संचार करून शरीर व मनाचे पोषण करतो. रसधातू दूषित झाल्यास अरुची, अभक्ती, हल्लास, अंगगौरव, ज्वर, कृशता व स्तन्यदोष अथवा मासिक पाळीच्या तक्रारी दिसून येतात. या अवस्थेत रसपाचक औषधोपचार उपयुक्त ठरतात.
रक्तपाचक (रोबस्ट–३)
रसधातूच्या योग्य पाचनातून रक्तधातूची निर्मिती होते. जीवनधारण, वर्णप्रसन्नता व सर्व धातूंना पोषण देणे ही रक्तधातूची प्रमुख कार्ये आहेत. रक्तदूष्टीमुळे त्वचारोग, कुष्ठ, विसर्प, रक्तपित्त, कामला, वातरक्त इत्यादी विकार उद्भवतात. यासाठी रक्तपाचक उपचार प्रभावी ठरतात.
मांसपाचक (रोबस्ट–४)
मांसधातू शरीराला बळ, स्थैर्य व कार्यक्षमता प्रदान करतो. सर्व स्नायूंची दृढता, शारीरिक श्रम सहन करण्याची क्षमता व अवयवांची पुष्टी ही मांसधातूवर अवलंबून असते. मांसधातू दूषित झाल्यास स्नायू शिथिल होणे, कृशता, दुर्बलता, रुक्षता व थकवा जाणवतो. अशा अवस्थेत मांसधातूचे योग्य पाचन व पोषण करणे अत्यंत आवश्यक ठरते. मांसपाचक (रोबस्ट–४) मांसधात्वाग्नि सुधारून स्नायूबल वाढवण्यास, शरीरपुष्टीस व दीर्घकालीन दुर्बलतेत उपयोगी ठरते.
मेदोपाचक (रोबस्ट–५)
मेदधातू शरीरातील आवश्यक स्नेह, ऊर्जा व स्निग्धता राखण्याचे कार्य करतो. सांधे सुरळीत हालचाल करावेत, अस्थिधातूची योग्य निर्मिती व्हावी तसेच स्वेद निर्मिती व्हावी यासाठी मेदधातू महत्त्वाचा आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, अपथ्यकर आहार व व्यायामाच्या अभावामुळे मेदधातूची विकृती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. स्थौल्य, प्रमेह, हृदयरोग, श्वास, कास, सांधेदुखी, अंगावर चिकटपणा, दाह व थकवा ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. मेदोपाचक (रोबस्ट–५) मेदधात्वाग्नि सुधारून अतिरिक्त मेदाचे पचन करते तसेच आवश्यक स्नेह संतुलित ठेवण्यास मदत करते.
अस्थिमज्जापाचक (रोबस्ट–६)
अस्थिधातू शरीराला आधार देतो, तर मज्जाधातू हाडांची पोकळी भरून काढणे, स्निग्धता प्रदान करणे तसेच मानसिक व शारीरिक बल वाढवणे यासाठी महत्त्वाचा असतो. नख व केस हे अस्थिधातूचे मल मानले जातात, तर दात हे त्याचे उपधातू आहेत. अस्थि व मज्जाधातूंच्या विकृतीमुळे हाडदुखी, सांध्यांत कडकपणा, केस गळणे व पांढरे होणे, दात ठिसूळ होणे, चक्कर येणे, मानसिक अशक्तपणा व एकाग्रतेचा अभाव दिसून येतो. अशा अवस्थेत अस्थि व मज्जाधात्वाग्नि सुधारण्यासाठी अस्थिमज्जापाचक (रोबस्ट–६) उपयुक्त ठरते. हे औषध सूक्ष्म स्त्रोतसांमध्ये कार्य करून केसांपासून मस्तिष्कापर्यंत होणाऱ्या विकारांवर सहाय्यक ठरते.
शुक्रधातुवर्धक (रोबस्ट–७ / सप्तधातुवर्धक)
शुक्रधातू हा सर्व धातूंचा सार मानला जातो. शरीरनिर्मिती, ओजवृद्धी, प्रजनन क्षमता, धैर्य व उत्साह हे शुक्रधातूचे प्रमुख गुण आहेत. शुक्रधातू केवळ प्रजननापुरता मर्यादित नसून, संपूर्ण शरीराच्या पेशीपातळीवरील पुनर्निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. शुक्रधातूच्या विकृतीमुळे वंध्यत्व, लैंगिक दुर्बलता, शारीरिक थकवा, मानसिक खचलेपणा व रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसतात. अशा अवस्थेत शुक्रधातुवर्धक व सप्तधातुवर्धक म्हणून कार्य करणारे रोबस्ट–७ सर्व धातूंना बल देऊन शरीर, मन व ओज यांचे समतोल पुनर्स्थापित करण्यास मदत करते.
निष्कर्ष
दोष, धातू व मल यांचा समतोल राखणे हेच आरोग्याचे मुख्य सूत्र आहे. योग्य आहार, विहार, अग्निदीपन व धातुपोषण करणाऱ्या औषधांच्या साहाय्याने शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवता येते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून जीवनमान उंचावते.
डॉ. रामदास कुटे.
