Mental Health

डॉक्टर, मला काही गंभीर तर नाही ना?  सध्याच्या युगातील मनाचा आजार

डॉक्टर, मला काही गंभीर तर नाही ना?  सध्याच्या युगातील मनाचा आजार आजच्या काळात पोटाचे विकार, संधिवात यांसारख्या आजारांवर उपचार घेणारा एखादा रुग्ण, सर्व तपासण्या नॉर्मल असतानाही, कोणतीही स्पष्ट लक्षणे नसताना हळूच विचारतो – “डॉक्टर, मला कॅन्सर तर झाला नसेल ना?” हा प्रश्न ऐकताना जाणवते की सध्याच्या युगातील मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गेल्या काही वर्षांत कोविड, लॉकडाऊन, जवळच्या व्यक्तींचे अकाली निधन, सामाजिक असुरक्षितता यामुळे अनेकांमध्ये अनाठायी भीती, चिंता आणि नैराश्य वाढताना दिसत आहे. काही जण आपली भीती बोलून दाखवतात, तर अनेकांना ते व्यक्त करणे गरजेचे आहे याची जाणीवही नसते. त्यामुळे वैद्य म्हणून आयुर्वेदशास्त्राच्या व्यापक दृष्टीकोनातून या समस्यांकडे पाहणे आवश्यक ठरते. भीती : नैसर्गिक की आजार? मानवी मनात आनंद–दुःख, उत्साह–उदासीनता, राग–दया अशा भावना असणे स्वाभाविक आहे. तसेच काही प्रमाणात भीती असणेही नैसर्गिक आहे. परंतु जेव्हा ही भीती कारणाशिवाय, सतत आणि तीव्र स्वरूपात जाणवू लागते, तेव्हा ती वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज दर्शवते. भीतीच्या अवस्थेत आढळणारी लक्षणे : · अंग थरथरणे, हातपायांना कंप · छातीत धडधड, दडपण · पोटात गडबड, झोप न लागणे · तोंड कोरडे पडणे, अस्वस्थता ही लक्षणे वारंवार आणि तीव्र झाल्यास पुढे फोबिया,

डॉक्टर, मला काही गंभीर तर नाही ना?  सध्याच्या युगातील मनाचा आजार Read More »